बाळ जन्मले आणि तिने दिली परीक्षा

    17-Oct-2020
Total Views |

n87;_1  H x W:  
 
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (वि.प्र.) : लाॅयला युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीला परीक्षा देतानाच प्रसवकळा सुरू झाल्या आणि तिने एका गाेंडस बाळाला जन्म दिला.त्यानंतरही तिने राहिलेली परीक्षा पूर्ण केली आणि एक नवा आदर्श प्रस्थापित केला.या महिलेचे नाव ब्रायना हिल्स असे आहे. शिकागाेमध्ये तिने बाळाला जन्म दिला. ती ऑनलाइन परीक्षा देत हाेती.परीक्षा अर्धी झाल्यावर तिला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पाच तासांनी तिने एका मुलाला जन्म दिला.नंतर घरी परतल्यावर तिने राहिलेली वकिलीची परीक्षा दिली.