उत्सवकाळात बेफिकीर राहू नका : आयुक्त हर्डीकर

    17-Oct-2020
Total Views |
नवरात्र उत्सवाला यंदा मुरड घाला; गणेशाेत्सवानंतर काेराेनाच्या साथीत झाली हाेती लक्षणीय वाढ
 
पिंपरी, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) : गणेशाेत्सवानंतर काेराेनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता येत्या अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. काेराेना साथराेगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नयनाट झाला नाही.काेराेना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालून साधेपणाने मात्र आंतरिक भक्तिभावाने नवरात्र उत्सव साजरा करावा. दांडिया, रावणदहन यासारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्तिभावाने आपआपल्या घरातच देवीची पूजा करावी आणि निराेगी भवितव्याची प्रार्थना करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासीयांना केले आहे.पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन करताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून काेराेनाच्या महामारीला आपण सामाेरे जात आहाेत. यामुळे शहराने अपरिमित नुकसान पाहिले आहे. अनेक नागरिक काेराेनाग्रस्त झाले आणि अनेक बरेदेखील झाले. मात्र, काही जणांना या साथीत जीव गमवावा लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत शहरातील नागरिकांनी पालिकेला खूप चांगले सहकार्य केले आहे. या कालावधीत आपण अनेक गाेष्टी अनुभवायला शिकलाे आहाेत. गणेशाेत्सवात विसर्जनासह विविध कार्यक्रम नियंत्रित केले.तरीदेखील गणेशाेत्सवानंतर काेराेनाच्या साथीत लक्षणीय वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता, येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. काेराेना साथराेगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नयनाट झालेला नाही. काेराेना गेलेला नाही.त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही.काेराेना कधीही हाेऊ शकताे.अनेकांना अद्यापपर्यंत काेराेनाची लागण झालेली नाही. लागण हाेऊ नये यासाठी प्रत्येकालाच काळजी घेण्याची गरज आहे.विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय 65 वर्षांहून अधिक आहे, अन्य दुर्धर आजाराने पीडित आहेत, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालावी. साधेपणाने मात्र आंतरिक भक्तिभावाने नवरात्र उत्सव साजरा करावा. दांडिया, रावणदहन यासारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्तिभावाने आप-आपल्या घरातच देवीची पूजा करावी.निराेगी भवितव्याची प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले.