डिप टीश्यूज मसाज स्नायूंच्या आतील थरांसाठी केला जाताे. या मसाजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा हळूहळू खूप मजबूत हातांनी केला जाताे जेणेकरून स्नायूदुखीपासून मुक्ती मिळवता येऊ शकेल. पाइन, लव्हेंडर, आले व पेपरमिंट अशा निरनिराळ्या प्रकारची तेल स्नायूंचे दुखणे कमी करण्यास उपयुक्त असतात.त्यामुळे यांचा वापर डीप टिश्यूज मसाजात हाेताे.
काय आहे डीप टीश्यूज मसाज : जाजेन स्पाचे डायरेक्ट दर्शन रावल म्हणतात की, मालिशने स्नायूंमधील रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे स्नायूंना ऊब मिळते व ते लॅक्तिक अॅसिड दूर करते आणि तेल स्नायूंना आराम देते व वेदनांपासून आराम देते. डीप टिश्यू मसाज स्नायूंच्या खाेल थराला आराम देण्यासाठी केला जाताे. त्यात अत्यंत सावकाश पण खाेल स्ट्राेक दिले जातात. या मसाजानंतर खूप पाणी प्यायला सांगितले जाते. जेणेकरून टाॅ्निसन बाहेर पडू शकेल. हा स्नायूतील जखडणे, लचक, पाेश्चर बिघडणे, कंबरदुखी व एखाद्या मारातून बाहेर पडण्यास उपयुक्त आहे.