शेक्सपिअरच्या पुस्तकाला लिलावात 73 काेटी रुपये किंमत
न्यूयाॅर्क : ख्यातनाम साहित्यिक विल्यम शेक्सपिअर याच्या नाटकांचे 1623 मधील एक पुस्तक लिलावात विक्रमी किमतीला विकले गेले. एखाद्या साहित्यकृतीला इतकी किंमत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे 73 काेटी रुपये किमतीला हे पुस्तक विकले गेले. या पुस्तकात शेक्सपिअरची 36 नाटके आहेत.