नेटवर्क नसल्याने व्हाेडाफाेन-आयडियाचे ग्राहक संतप्त

    17-Oct-2020
Total Views |
पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने कंपनीचे पुण्यातील नेटवर्क बंद पडल
 
vf5;_1  H x W:
 
पुणे, 16 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूजनेटवर्क, पुणे) पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी व्हाेडाफाेनआयडियालाही बसला आहे. ग्राहक मात्र सततच्या नेटवर्क समस्येने त्रस्त झाले असून, हिराबाग भागातील कंपनीच्या सेंटरसमाेर अनेक संतप्त ग्राहक जाब विचारण्यास जमले हाेते.अखेर पाेलिसांना पाचारण करण्यात आले. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, याचा फटका आयडिया व्हाेडाफाेन या दाेन्ही कंपन्यांनाही बसला आहे. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने कंपनीची नेटवर्क सेवा काेलमडली असून, ग्राहकांना त्रासाला सामाेर जावं लागत आहे. ग्राहकांनी कंपनीकडे तक्रारी नाेंदवल्यानंतर पावसामुळे नेटवर्क सेवेत बिघाड झाल्याचा खुलासा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यातही घरून काम करणाऱ्या अनेक नाेकरदारांना याचा त्रास सहन करावा लागला.व्हाेडाफाेन-आयडियाची दूरसंचार सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या समस्येत माेठी भर पडली. पाऊस काेसळत असतानाच ग्राहकांना ‘नाे नेटवर्क’चा सामना करावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी ग्राहकांना या समस्येला सामाेरं जावं लागत असून, नाे नेटवर्कमुळे वैतागलेल्या ग्राहकांनी ट्विटरच्या माध्यमातून कंपनीकडे तक्रारींचा पाऊसच पाडला आहे.राष्ट्रवादीचे आमदार राेहित पवार यांनीही नेटवर्क प्राॅब्लेमकडे कंपन्यांचं लक्ष वेधलं आहे. राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा स्थितीत वेळीच मदत पाेचण्यासाठी संपर्कासाठी माेबाइल कंपन्यांची सेवा विस्कळीत हाेऊन चालणार नाही. पण काही भागांत काॅल ड्राॅप हाेणं/नेटवर्क न मिळणं या अडचणी येताहेत. माेबाइल कंपन्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राेहित पवार यांनी केले आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांत रात्रीपासून कंपनीचं नेटवर्क अनेक भागातून गायब झालं आहे. कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं ग्राहक ट्विटरवरून आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत.