शैक्षणिक सुधारणांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पाला मंजुरी

    16-Oct-2020
Total Views |

g6_1  H x W: 0  
 
नवी दिल्ली, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) : शैक्षणिक सुधारणांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘स्टार्स’ प्रकल्पाला मंजुरी दिली.या प्रकल्पात महाराष्ट्रासह अन्य 5 राज्यांचा समावेश आहे. स्ट्रेंथनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिजल्ट्स फाॅर स्टेट्स (स्टार्स) या प्रकल्पाची याेग्य अंमलबजावणी करण्यासाठी 5718 काेटींची आवश्यकता भासणार आहे. यासाठी जागतिक बँकने 500 काेटी डाॅलर (कमाल 3700 काेटी रुपये) मदत जाहीर केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. स्टार्स प्रकल्प केंद्र प्रायाेजित आहे. हा प्रकल्प केंद्रीय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाच्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, ‘पारख’ या स्वतंत्र आणि स्वायत्त संस्थेंतर्गत राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प 6 राज्यांत राबवण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओदिशा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकल्पात शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांना पाठिंबा दिला जाईल.