पुण्यात पाच ठिकाणी पाेस्ट काेविड ओपीडी

    16-Oct-2020
Total Views |
पालिकेच्या आराेग्यप्रमुखांची माहिती : काेराेनामुक्तांना देणार दिलासा
 
g5_1  H x W: 0  
 
पुणे, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) : काेराेना मुक्त रुग्णांच्या आराेग्यविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शिवाजीनगर व बाणेर येथील जम्बाे काेव्हिड सेंटर, नायडू व ससून रुग्णालय आणि पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब मगर स्टेडियम काेव्हिड सेंटर येथे पाेस्ट काेविड ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.या ओपीडींमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत कराेनामुक्ताच्या आराेग्यविषयक तक्रारींवर उपचार दिले जाणार आहेत. तसेच, मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे नवे आराेग्यप्रमुख डाॅ.आशिष भारती यांनी दिली.काेराेनामु्नत झालेल्या रुग्णांबाबतच्या समस्या साेडवण्यासाठी प्रशासनाने ‘पाेस्ट काेविड मॅनेजमेंट प्लान’ तयार केला आहे. त्या अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पाच ठिकाणी या ओपीडी चालवण्यात येणार आहेत. पुण्यात आतापर्यंत 1 लाख 34 हजारांहून अधिक नागरिक काेराेनामु्नत झाले आहेत. त्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या काेराेना लक्षणांचा सामना करून बरे झालेल्यांची संख्या लक्षणीय असून, त्यांपैकी अनेकांना काेराेना पश्चात आराेग्याच्या समस्या भेडसावत आहेत.त्यात फुप्फुसाची क्षमता कमी हाेणे (लंग फायब्राेसिस), रक्ताच्या गुठळ्या हाेणे, पक्षाघाताचा त्रास, अंगदुखी, निरुत्साह, ऑक्सिजन कमी झाल्याने थकवा जाणवणे, अशा शारीरिक तक्रारींचा समावेश आहे काहींना मानसिक समस्याही जाणवत आहेत.अशा काेराेनामु्नतांसाठी पाेस्ट काेविड ओपीडींची गरज व्यक्त केली जात हाेती.त्यानुसार, महापालिकेतर्फे शिवाजीनगर व बाणेर येथील जम्बाे काेव्हिड सेंटर, नायडू रुग्णालयात पाेस्ट काेविड ओपीडी चालविण्यात येणार आहेत. राज्य सरकारतर्फे ससून आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मगर स्टेडियममधील काेविड केंद्रात पाेस्ट काेविड ओपीडी चालवली जाणार आहे.