आपल्या शरीराचा डाटाबेस

    16-Oct-2020
Total Views |

n6_1  H x W: 0  
 
प्रत्येक सजीवाचे आई-वडिलांकडून आलेले आनुवंशिक गुणधर्म असतात. ते त्याच्या पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांत म्हणजेच क्राेमाेझाेम्समध्ये साठवलेले असतात. तुम्ही अनेकवेळा डी एन ए हा शब्द ऐकला असेल तर ही जी गुणसूत्रे असतात ना ती डीएनए अर्थात डिओक्सिरिबाे न्यूक्लिक अ‍ॅसिड या जीवरेणूपासून बनलेली असतात. म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेला डीएनए हा आनुवंशिकतेचा जीवरेणू आहे. या भल्यामाेठ्या डीएनए रेणूचे काही विशिष्ट छाेटे भाग म्हणजे जनुके हाेय. ज्याला जीन्स असे म्हणतात. माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये 23 गुणसूत्रांच्या जाेड्या असतात. मानवी जनुकांचा संपूर्ण संच, सर्व जनुकीय सामग्री याला मानवी जीनाेम अर्थात जनुक संचय असे म्हटले जाते. हा जिनाेम माणसाच्या पेशींमध्ये असलेल्या केंद्रकामधील 23 वेगवेगळ्या गुणसूत्रांच्या जाेड्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असताे. हे म्हणजे आपल्या शरीराचा डाटाबेसच आहे, असे म्हणायला हरकत नाही.