‘दिलखुलास’मध्ये डाॅ. पांढरपट्टे यांची मुलाखत

    16-Oct-2020
Total Views |
 
b67_1  H x W: 0
 
मुंबई, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचनातच ज्ञानाचे भांडार’ या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डाॅ. दिलीप पांढरपट्टे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवारी (16 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हाेईल. तसेच, न्यूज ऑन एअर (पशुीेपरळी) या अ‍ॅपवरही याच वेळेत ऐकता येईल. निवेदिका उत्तरा माेने यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे महत्त्व, वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषा विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबवण्यात आलेला अभिवाचन उपक्रम, प्रशासकीय अधिकारी आणि लेखक म्हणून असलेली आवड, आपल्या वाचनाची प्रेरणा, वाचनाचे बदलते स्वरूप, ऑडिओ बुक, तसेच साेशल मीडिया व वाचन, गझलबराेबरच ललित लेखन, कथासंग्रह, विनाेदी लेखसंग्रह, शायरी, बाेधकथा, कविता व गद्य लेखन, उर्दूबाबतही लिखाणाची प्रेरणा, चाैफेर वाचन, शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण हाेणे गरजेचे असल्याविषयी सविस्तर माहिती डाॅ. पांढरपट्टे यांनी दिली आहे.