शिक्षण आणि मनाेरंजनासाठीचा विद्यार्थ्यांचा खरा दाेस्त : इंटरनेट

    15-Oct-2020
Total Views |
 
l98_1  H x W: 0
 
 
संध्यानंद.काॅम
इंटरनेट विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वरदान आणि शाप दाेन्ही ठरते. जर याचा ज्ञानवर्धनाच्या दृष्टीने याेग्य उपयाेग केला तर विद्यार्थी कितीतरी वेगाने आपला बाैद्धिक विकास करू शकतात.केवळ चॅटिंग आणि मनाेरंजनापुरताच याच उपयाेग केला गेला तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय राहील.पण हल्ली विद्यार्थ्यांचे याच्या दुर्लक्षाकडे जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. साेशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून चुकीच्या गाेष्टींच्या संपर्कात येणे, दिवस-रात्र चॅटिंग करणे, चांगलं-वाईट साहित्य प्रकाशित-प्रसारित करणे याचं प्रमाण वाढतंय...काही विश्वविद्यालयांच्या मते, इंटरनेट शिक्षणाच्या गुणवत्तेच्या खालावण्यासाठी जबाबदार आहे. पण याचा दुसरा पैलूही आहे. 1989 मध्ये वर्ल्ड वाइड वेबच्या आगमनानंतर इंटरनेटच्या माध्यमातच एकाएकी एवढ्या प्रचूर, विविध आणि उपयुक्त प्रमाणात सामग्री विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचू लागली. एवढ्या प्रकारची माहिती या माध्यमातून आपल्यापर्यंत पाेहचतीये की, त्याची यादी बनवावी म्हटलं तरी आयुष्य कमी पडेल. सूचनेच्या या क्रांतीने ज्या क्षेत्रांना सर्वाधिक प्रभावित केलं आहे, त्यामध्ये शिक्षण क्षेत्राचं स्थान निश्चितच महत्त्वाचं आहे.सामान्यतः इंटरनेट एक सूचनेचं भांडार आहे, ज्यामध्ये जे हवं ते आपल्या शैक्षणिक सुविधेसह प्राप्त करता येते.कधी कधी विद्यार्थी याच्या लाभापासून वंचित राहतात, जे आपल्या अध्ययनात खूप उपयुक्त असतात.
 
फाइंड ट्युटाेरिअल्स काय आहे?
फाइंड ट्युटाेरिअल्सच्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या ट्यूटाेरियल शाेधण्यासाठी करतात. तर बुक ाउंडरच्या माध्यमातून काेणत्याही विषयावर पुस्तकं शाेधून डाऊनलाेड करू शकताे. ही पुस्तकं माेफत तर नसतात, पण बरीच स्वस्त असतात. जर राजस्थान बाेर्डाचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला एनसीआरटीच्या वेबसाइटच्या ई-बुकच्या स्वरूपात माहिती मिळवून आपलं ज्ञान वाढविता येतं. केवळ पुस्तकंच नाही तर वेगवेगळ्या स्वरूपात माहिती मिळवता येते.
 
काय डाऊनलाेड कराल?...
विद्यार्थी हवं तर आपल्या आवडीच्या विषयाशी संबंधित उत्कृष्ट शैक्षणिक सामग्री, ई-बुक्स, शाेधपत्र इत्यादी इंटरनेटवर डाऊनलाेड करू शकतात.शीर्ष आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय, ग्रंथालयं आणि शाेध संस्थांनी खूप सामग्री सार्वजनिक वितरणासाठी ठेवली आहे. काही अनुत्तरित प्रश्नांची यादी देखील येथे मिळेल. एवढंच नाही, तर प्रॅक्टिकलसाठी इंटरनेटवर असणाऱ्या व्हर्च्युअल प्रयाेगशाळेचा लाभही घेऊ शकता. परीक्षेच्या तयारीसाठी काही वेबसाइट्सवर दिलेल्या माॅक टेस्ट सुविधेचाही फायदा घेऊ शकता. तसंच वेब आधारित पाठ्यक्रमांचा आधार घेत घरबसल्या ई-एज्युकेशनच्या माध्यमातून अभ्यास करू शकता.
 
अन्य नाेट्स वेबसाइटस : एक आणखी उपयुक्त वेबसाइट आहे, माय नाेट इट जिथे विद्यार्थी आपल्या नाेट्स काढू शकतात. तिथे दुसऱ्यांबराेबर तुलना करू शकता.दुसऱ्यांच्या नाेट्स शाेधणं एवढं साेपं नाही. जर तुम्हाला तुमचं वेळापत्रक किंवा वार्षिक नियाेजन करायचं असेल तर उपलब्ध टू डू लिस्ट नावाची सुविधा वापरू शकताे. यामुळे राेज काय करायचं, याची माहिती तुम्हाला मिळू शकेल.