खापरखेडा, परळी केंद्रात विक्रमी वीज उत्पादन

    15-Oct-2020
Total Views |

h67_1  H x W: 0
 
नागपूर, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) : काेराेना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळाच्या तुलनेत अनलाॅकदरम्यान विजेची मागणी वाढली असून, वीज कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे विजेचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान महानिर्मितीच्या खापरखेडा व परळी वीज केंद्राने विक्रमी उत्पादन करण्यात यश प्राप्त केले आहे.परळी औष्णिक वीज केंद्रात 250- 250 मेगावाॅट क्षमतेच्या युनिट क्रमांक 6, 7 व 8 ने 732 मेगावाॅटचे उत्पादन केले. तेथे 98 टक्के प्लांट लाेड फॅक्टर (क्षमतेप्रमाणे उत्पादन) केले आहे. हा एक विक्रम आहे. त्याचप्रकारे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या युनिट क्रमांक 4 मध्ये गेल्या 100 दिवसांत सलगपणे विजेचे उत्पादन सुरू आहे.याच केंद्राचे 500 मेगावाॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 5 गेल्या 96 दिवसांत विजेचे उत्पादन करत आहे. महानिर्मितीच्या व्यवस्थापकांनी दाेन्ही वीज केंद्रांच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे याबाबत काैतुक केले आहे. काेराेनाच्या काळात औद्याेगिक व वाणिज्यिक विजेचा वापर जवळपास थांबला हाेता. केवळ घरगुती व कृषीसाठी विजेची मागणी हाेती. परिणामी, जवळपास 6 हजार मेगावाॅट मागणी कमी झाली हाेती. आता राज्यातील औद्याेगिक व वाणिज्यिक कामे हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे महानिर्मितीने औष्णिक वीज केंद्रातील उत्पादन वाढवले आहे.