काेराेनाबाधित दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कल्याण निधीची रक्कम प्रदान

    15-Oct-2020
Total Views |
 
gy8_1  H x W: 0
 
नवी मुंबई, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) : नवी मुंबई महापालिकेचे दिवंगत कनिष्ठ अभियंता चेतन पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना महापालिकेच्या कामगारकल्याण निधीतून 50 लाख रुपयांचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. विशेष सानुग्रह अनुदान स्वरूपात ही रक्कम देण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त याेगेश कडुस्कर, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यावेळी उपस्थित हाेते. इतरही दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही पालिकेच्या वतीने विशेष सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान करण्यात येत आहे. काेराेनाविराेधातील लढाईत प्रतिबंधात्मक उपाययाेजना राबवताना नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी अविश्रांत काम करत आहेत. त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे, याकडे आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष लक्ष असून, काेराेनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपचार कालावधी व बरे झाल्यानंतर तंदुरुस्त हाेऊन वैद्यकीय सल्ल्याने कामावर रुजू हाेण्याचा कालावधी कर्तव्य कालावधी मानण्यात येईल, असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.