मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत काेराेनामुक्तीचा दर 88 टक्के

    14-Oct-2020
Total Views |

hy78_1  H x W:  
 
मिरा-भाईंदरमध्ये एकीकडे काेराेनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, दुसरीकडे काेराेनामुक्त रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. आजवर 88.10 टक्के रुग्णांना काेराेनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले असून, रुग्णदुपटीचा वेग 29 दिवसांवर गेला आहे.
शहरात बाधितांची संख्या 19942 वर पाेहचली आहे, तर आतापर्यंत 616 रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.अशा परिस्थितीत रुग्णसंख्या आटाेक्यात आणणे आणि रुग्णांवर याेग्य उपचार करून त्यांना काेराेनामुक्त करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमाेर आहे.त्यामुळे प्रतिदिवस शंभरच्या गतीने वाढणाऱ्या रुग्णांनाही याेग्य उपचार करून घरी पाठवण्यात येत आहे. लाॅकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मिरा-भाईंदरमध्ये रुग्णसंख्यावाढीचा आलेख झपाट्याने वर जाताना आढळला हाेता. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णांना याेग्य उपचार करून काेराेनामुक्त करण्यात येत असल्याने काेराेनामुक्त रुग्णांचे प्रमाण आता सरासरी 88.10 टक्के झाले आहे. नागरिकांनी कठाेरपणे नियमांचे पालन केल्यास हे प्रमाण लवकरच कमी हाेऊन काेराेनावर मात करण्यात यश येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.