स्मार्टाेन, टेलिव्हिजन, संगणक, टॅब्ज, गेम्स, आयपॅड्स, आयपाॅड्स या सगळ्या गाेष्टी आता आपल्या मुलांचा ताबा घेतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. वाजणाऱ्या, गाणाऱ्या, खेळणाऱ्या, चमकणाऱ्या गॅजेटसला मुले इतकी चिटकून बसतात की, जणूकाही त्यांना तिथे कुणीतरी साखळदंडाने बांधले असावे. अनेकदा माेठ्या माणसांचीदेखील अशीच स्थिती झाल्याचे दिसून येते.
अगदी समाेरासमाेर बसून मुलांशी बाेलणे किंवा गप्पा मारणेदेखील दुर्मीळ झाले आहे. काही पालकांना तर मुलांशी थेट बाेलण्याऐवजी त्यांना ई-मेल पाठवणे किंवा एसएमएस करणे साेपे वाटू लागले आहे. एकमेकांशी आपुलकीने बाेलणे, मायेने पाठीवरून हात फिरवणे हे सगळे संपून या सगळ्या गॅजेटस्ना चिटकून राहणे हे अनेकांचे एक पूर्ण वेळ काम बनले आहे.
इंटरनेटद्वारे कनेक्ट असणे आणि स्मार्टाेनच्या वापराचे अनेक फायदे असले तरी स्क्रीनच्या माध्यमातून साेशल हाेण्यापेक्षा परस्परांच्या सान्निध्यातून नाती समृद्ध करायला शिकले पाहिजे.लाेकांशी बाेलण्यातून आणि त्यांच्या निरीक्षणातून मुले अनेक चांगले गुण शिकतात. जसे की अनुभूती, दयाळूपणा, विश्वास, जबाबदारी, प्रामाणिकपणा अशा गुणांची जाणीव लाेकांच्या प्रत्यक्ष संपर्कातून आणि सहवासातूनच हाेत जाते.त्यामुळेच मुलांच्या फायद्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा किती वेळ वापर करावा आणि त्याचवेळी वाय-ायवर विसंबून न राहता कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्यातील संतुलन कसे साधायचे, हे पालकांनी मुलांना शिकवले पाहिजे.
अगदी विसाव्या वर्षापर्यंत मुलांचा मेंदू विकसित हाेत असताे. त्यांची पारखक्षमता आणि निर्णयक्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यांना पालकांचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि आपल्यासाठी काय याेग्य आहे, काय अयाेग्य आहे यासाठी पालकांची मदत लागत असते. त्याच वेळी तंत्रज्ञानाच्या वापरातून त्यांना अनेक गाेष्टी खुणावत असतात किंवा त्यांना अनेक गाेष्टींचा माेह वाटत असताे. या आकर्षणांपासून स्वतःला दूर ठेवण्याची परिपक्वता त्यांच्यामध्ये आलेली नसते.या सगळ्याला पालक कसा प्रतिसाद देतात, यावर अनेक गाेष्टी अवलंबून असतात.