पुण्यात सीसीटीव्हीचे जाळे वाढवून विस्तारीकरण करणार : अमिताभ गुप्ता

    14-Oct-2020
Total Views |
 
nnj7_1  H x W:
 
पुणे, 13 ऑक्टाेबर (आ.प्र.) : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांतच संपूर्ण शहरात 1500 सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित हाेतील, अशी माहिती नवनियुक्त पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार माेठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवून पुणेकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे, यासाठी काही नवीन याेजना कार्यान्वित केल्या जातील. शहरातील सीसीटीव्हींचे जाळेही विस्तारले जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले. शहराचा वाढता विस्तार पाहता, पाेलीस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करावी लागणार आहे. यापूर्वी रचना केलेल्या उपायुक्त (झाेन) कार्यालयांना राज्य सरकारची मंजुरी घेणे बाकी आहे.
त्यासाठीचा प्रस्तावही तयार करून पाेलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. या मंजुरीेनंतर नव्याने सर्वे क्षण करून नवीन पाेलीस ठाणी आणि झाेन तयार केले जातील. यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार असून, त्यासाठीही आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.