याेग्य वेळी मदत केल्याबद्दल विद्यार्थ्याची कृतज्ञता
एका बँकेतील कार्यकारी अधिकाऱ्याने स्वत:च्या मालकीचे 30 लाखांचे शेअर्स त्याच्या एका शिक्षकाला भेट म्हणून दिले आहेत.
या शिक्षकाने गरजेच्या वेळी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकारी व्ही. विद्यानाथन यांनी हे शेअर्स गिफ्ट केले आहेत.विद्यानाथन यांनी 30 लाख किंमत असणारे एक लाख इक्विटी शेअर्स त्यांना शालेय जीवनामध्ये गणिताचे धडे देणाऱ्या गुर्दील स्वरूप सायनी या शिक्षकाच्या नावे ट्रान्सफर केले आहेत. सायनी यांनी विद्यानाथन यांना शालेय जीवनामध्ये मदत केली हाेती. या संदर्भातील एक फेसबुक पाेस्ट सध्या व्हायरल झाली आहे. या पाेस्टमध्ये ‘विद्यानाथन यांना मुलाखतीला जाण्यासाठी सायनींनी आर्थिक मदत केली हाेती. सायनी यांनी विद्यानाथन यांच्या प्रवास भाड्याची साेय केली हाेती. विद्यानाथन यांना बीआयटीएसमध्ये प्रवेश मिळाला, तेव्हा त्यांच्याकडे मुलाखतीला जाण्यासाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे नव्हते. त्या वेळी सायनी हे त्यांचे गणिताचे शिक्षक हाेते. सायनी यांनी त्यांना 500 रुपयांची मदत केली हाेती. याच मदतीच्या जाेरावर विद्यानाथन मेसरामधील बीआयटीएसमध्ये गेले आणि तेथूनच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.पुढे विद्यानाथन यांनी आपल्या क्षेत्रात खूप प्रगती केली,’ असे या पाेस्टमध्ये म्हटले आहे.विद्यानाथन यांनी पुढील काळात सायनी यांचा शाेध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण सायनी सतत नाेकरी बदल असल्याने त्यांना माहिती मिळू शकली नाही, तरी विद्यानाथन यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सायनी यांचा शाेध सुरूच ठेवला. अखेर सायनी हे आग्रा इथ असल्याचे विद्यानाथन यांना समजले. त्यांनी सायनी यांना फाेन करून त्या वेळी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, असे या पाेस्टमध्ये नमूद केले आहे. बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये, ‘विद्यानाथन यांनी स्वत:च्या मालकीचे आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेडचे एक लाख इक्विटी शेअर्स त्यांचे शिक्षक असणाऱ्या गुर्दील स्वरुप सायनी यांच्या नावे ट्रान्सफर केले आहेत,’ अशी माहिती दिली आहे.