राज्यातील काेराेना मृत्यूचे ऑडिट हाेणार : हसन मुश्रीफ

    13-Oct-2020
Total Views |
 
49o_1  H x W: 0
 
काेल्हापूर, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) : काेल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत काेराेनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या माेठी आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली आहे.प्रामुख्याने या तीन जिल्ह्यांसह राज्यातील काेराेना मृत्यूचे ऑडिट हाेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. या तीन जिल्ह्यांत काेराेनाचा मृत्युदर जास्त आहे. त्यामुळे याची दखल मंत्रिमंडळाने घेतली. त्यानुसार प्रामुख्याने या तीन जिल्ह्यांसह राज्यातील काेराेना मृत्यूचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्यांना आधी काही आजार हाेते का, डाॅक्टरांचा हलगर्जीपणा नडला का, संबंधित रुग्णाला दाखल कधी केले, त्याच्यावर काेणते उपचार केले, औषधे, इंजेक्शन्स काेणती दिली, या सर्व बाबींचे हे ऑडिट असेल. त्यातून नेमके काेराेनामुळेच किती मृत्यू पावले, याचा नेमका आकडा समाेर येईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यभरात अनेक काेराेनायाेद्ध्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मात्र, त्यातील अनेक जणांचे काम प्रकाशात आलेले नाही. अशांचा जिल्हा परिषदांच्या वतीने सत्कार करण्याचा मानस असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.