पाेटदुखी नि सर्दीने अमेरिकन बेजार

    12-Oct-2020
Total Views |
काेव्हिडकाळातही अन्य आजारांचा प्रादुर्भाव सुरुच
 
काेव्हिड-19 सारख्या आजारातही लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून आजार पसरवला जाताे. याच पद्धतीने अन्य विषाणूजन्य आजार लक्षणे नसलेल्या लाेकांकडून पसरले जातात.
 
de44_1  H x W:
 
काेव्हिड-19 पासून संरक्षण मिळवण्यासाठी लाेक काळजी घेत असल्यामुळे अन्य आजारांपासूनही त्यांना संरक्षण मिळत असून, अन्य आजारांचे रुग्ण कमी झाले आहेत, अशी चर्चा अलीकडे भारतात सुरू झाली हाेती. पण अमेरिकेत तरी असे चित्र नाही. तेथे लाेक सर्दी, पाेटदुखी, घसा दुखण्यासारख्या आजारांनीही त्रस्त झाले आहेत.अमेरिकेमध्ये काेव्हिड-19 चे रुग्ण जगभरातील अन्य देशांमधील रुग्णांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे तेथे नियमांचे कसाेशीने पालन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण गाेलार्धातील ऑस्ट्रेलिया, चिली आणि दक्षिण आफ्रिकेत मे आणि जूनमध्ये दर वर्षी येणारी फ्लूची साथ या वर्षी आली नाही. ऑस्ट्रेलियामधील माहितीनुसार काेव्हिड-19 साथराेगाशी लढण्यासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे इतर विषाणूंचा त्रास जाणवला नाही. असेच चित्र अमेरिकेतही दिसेल, असे वाटत हाेते.अमेरिकेत या वर्षी तुलनेने अन्य विषाणूंचा प्रभाव कमी असला, तरीही सर्दीसारखी छाेटी दुखणी येथे कायम असल्याचे दिसले. विशेषतः मुलांना सर्दीसारखे आजार लवकर हाेताना दिसतात आणि ते त्यांच्याकडून चटकन पसरवलेही जातात. कारण मुले डाेळे चाेळत असतात किंवा सतत नाकाला हात लावत असतात. त्यामुळे जिवाणू आणि विषाणूंचा लवकर फैलाव हाेताे. श्वसनमार्गाचे विकार ऋतूप्रमाणे येतात आणि जातात, असे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशाेधकांनी सांगितले. तर ‘लाेकांना साधारणतः प्राण्यांपासून अधिक आजार हाेतात, असे दिसून आले आहे,’ असे मत केंट स्टेट विद्यापीठाचे साथराेगातज्ज्ञ तारा स्मिथ यांनी स्पष्ट केले.‘सर्दीला कारक विषाणू अद्याप पसरला जात असेल, तर आपल्याकडे अजूनही लाेकांचा एकमेकांशी संपर्क येत आहे, असे लक्षात येते,’ असे निरीक्षण स्मिथ यांनी नाेंदवले. काेव्हिड-19 सारख्या आजारातही लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून आजार पसरवला जाताे. याच पद्धतीने अन्य विषाणूजन्य आजार लक्षणे नसलेल्या लाेकांकडून पसरले जातात. एखाद्या व्यक्तीची राेगप्रतिकारशक्ती अधिक असते, त्यामुळे त्या व्यक्तीला त्रास जाणवत नसला, तरी अन्य व्यक्तींच्या बाबत तसे हाेत नाही आणि ते चटकन या आजाराचे शिकार हाेतात.