शिक्षण, नावीन्य, तंत्रज्ञान यांचा मेळ घालत वंचित गरजू तरुणांना राेजगार मिळवून देण्याचे काम आकाश सेठी कशाप्रकारे करतात, हे त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊ.
मी देशातील अनेक शहरांमध्ये राहिलाे आहे. लहानपणापासूनच डाव्या हाताने काम करीत असल्यामुळे मला भेदभावाला आणि चेष्टेला सामाेरे जावे लागले. माझ्या संथ लिहिण्यामुळे मी नववीत नापास झालाे. अशावेळी मी धैर्याने इतर काेणाऐवजी स्वत:कडूनच शिकण्यास सुरुवात केली. या दरम्यान शाळेच्या बास्केटबाॅल टीममध्ये सामील झालाे. तिथे मला नवी ओळख मिळाली. मी खूप मेहनत केली आणि कॅप्टन हाेऊन टीमचे नेतृत्व करू लागलाे.सुमारे सहा वर्षे मी शाळा, जिल्हा आणि राज्याच्या संघांची कॅप्टनशिप केली. मी सेंट झेवियर काॅलेज, अहमदाबादमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दाेन वर्षे मी कँपसबाहेर एक छाेटासा फूड बिझनेस चालवला.शिक्षणप्रणालीच्या माेहभंगामुळेच मला काही वेगळे करण्यासाठी प्रेरित केले. तेव्हा इंटरनेट भारतात आला हाेता. यादरम्यान मी एका युवा संघटनेत सहभागी झालाे आणि देशभरातील सुमारे 200 तरुणांसाेबत संमेलनात भाग घेतला.
संस्कृतीच्या देवाणघेवाणीच्या कार्यक्रमांतर्गत मी अनेक देशांचा प्रवास केला. 2003 मध्ये मी आंतरराष्ट्रीय युवा फेलाेशिपमध्ये सहभागी झालाे आणि त्याचाच एक कार्यक्रम म्हणून क्वेस्ट अलायंसची सुरुवात केली. याचा उद्देश शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना शिक्षण आणि संशाेधन, आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत करणे हा हाेता. 2009 मध्ये मी हे स्वत:च्या संघटनेच्या रूपात स्थापित केले.डिजिटल मंच आमचा मंच डिजिटल स्व-अभ्यास आणि वर्गाच्या दैनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाजाराेन्मुख काैशल्य विकसित करण्यात सक्षम बनवताे.तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवताे. जेणेकरून ते स्वत:च्या करिअरसाठी याेग्य मार्ग निवडून भविष्यात यश मिळवतील.काैशल्य प्रशिक्षण आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमाने आम्ही 25 राज्यांच्या शेकडाे शाळांच्या शिक्षकांना व तरुणांना जाेडण्यात यशस्वी झालाे आहे. कार्यक्रमात सहभागी हाेऊन शिक्षकांनी अध्यापनाचे तर तरुणांनी काैशल्य विकासाचे नवे प्रकार शिकले आहेत.प्रशिक्षितांना राेजगार ्नवेस्ट अलायंस (गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि काैशल्य प्रशिक्षणाचा संगम) ग्रामीण आणि शहरी भागातील प्रामुख्याने वंचित पार्श्वभूमीतील ज्यांना राेजगार व काैशल्यविकासाची तातडीने गरज आहे अशा तरुणांचा फायदा करून देते. आमच्या कार्यक्रमातून प्रशिक्षित तरुण आता स्वयंराेजगार वा नाेकरी करीत आहेत.
आमच्या संस्थेने आतापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण व काैशल्य प्रशिक्षणाद्वारे चार लाखांहून जास्त लाेकांचे जीवन सुधारले आहे.
आमची संस्था शिक्षण आणि राेजगारातील दरी दूर करण्याचे काम करते.