दिलखुलासमध्ये आदिती तटकरे यांची मुलाखत

12 Oct 2020 13:16:08

34eh_1  H x W:
 
मुंबई, 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा या विषयावर उद्याेग, खनिकर्म, पर्यटन, फलाेत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून साेमवारी (12 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हाेईल, तसेच न्यूज ऑन एअर (पशुीेपरळी) या अ‍ॅपवरही याचवेळेत ऐकता येईल. ही मुलाखत निवेदिका रेश्मा बाेडके यांनी घेतली आहे.राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय, बीच शॅक धाेरण, तीर्थक्षेत्र पर्यटन, फलाेत्पादन विभागाच्या याेजनांना देण्यात येणारी गती, क्रीडा व युवककल्याण विभागाच्या याेजना व उपक्रम, रायगड जिल्ह्यातील पर्यटन व विकासाला देण्यात येणारी गती, निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान व शासनाकडून करण्यात आलेली मदत, काेव्हिड कालावधीत उद्याेग विभागासाठी घेण्यात आलेले निर्णय यासंदर्भात सविस्तर माहिती आदिती तटकरे यांनी दिलखुलास कार्यक्रमात दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0