वृषभ

    11-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात तब्बेत उत्तम राहील आणि कारभाराचा विस्तार करण्याची अनुकूल संधी तुमच्याकडे चालून येईल. या काळात तुम्ही शक्यतो तर्क-वितर्कापासून दूर राहावे. नाेकरदार जातकांनी बाेलताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्या कटू बाेलण्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या रुचकर विषयात पुढे जाऊ शकता. तुम्हाला कमी श्रमात जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमची जाणशक्ती सुधारेल. तुम्ही जमिनीसंबंधित व्यवहारात फायदा मिळवू शकताे. सरकारी कामांनाही वेग येईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही नवनवीन लाेकांच्या संपर्कात याल व त्यांच्याविषयी तुमच्या मनात प्रेम उत्पन्न हाेण्याची शक्यता आहे. या काळात हिंडण्या-फिरण्याचे प्रबळ याेग आहेत. भेट आणि डेटिंगवर तुम्ही विशेष लक्ष द्याल. जर नात्यात पूर्वीपासून तणाव असेल तर ताे या आठवड्यात दूर हाेईल.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला शारीरिक जाेम आणि स्फूर्ती जाणवण्याची जास्त शक्यता आहे. काेणत्याही प्रकारच्या गंभीर आजाराची शक्यता नाही. या काळात तुमची पचनशक्ती उत्तम राहील आणि तुम्ही मनपसंत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकाल.
 
शुभदिनांक : 11, 12, 16 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात व्यावसायिक दिशेने केलेले प्रयत्न फलद्रूप हाेतील, पण गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
 
उपाय : या आठवड्यात मंगळवारी लाल मसूर दान करावे. धाेत्र्याचे मूळ वा फूल गळ्यात धारण करावे. दर मंगळवारी व शनिवारी मारूतीला शेंदूर लावावा. शनिवारी शनिमंदिरात जाऊन गरजूंना मदत करावी.