वृश्चिक

    11-Oct-2020
Total Views |
तुम्ही जर मार्केटिंग, शिक्षण इ. क्षेत्रात काम करीत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला आर्थिक लाभ हाेण्याची पूर्ण शक्यता आहे. विद्यार्थीवर्गालाही हा काळ अनुकूल आहे. तुम्ही भाेगविलासाचा आनंद घ्याल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा नाेकरदार व व्यावसायिक दाेहाेंसाठी लाभदायक ठरणारा असू शकताे. नवीन लाेकांशी भेटून फायद्यात वाढ हाेऊ शकते. तुम्हाला नाेकरीत नवी व उत्तम ऑफर मिळू शकते. तुम्हाला नवे पद मिळू शकते. तसेच यशातही वाढ हाेईल. करियरमध्ये अचानक एक नवा टप्पा गाठू शकता.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात माधुर्य टिकून राहील. तुम्ही इतर साधनांच्या माध्यमातून सतत तुमच्या प्रियजनांच्या संपर्कात राहाल. तुम्ही तुमच्या प्रियजनांशी भेट घेण्यातही यशस्वी ठरणार आहात. तुम्ही तुमच्या परिचित, नातलग व शेजाऱ्यांशी उत्तम वागण्याचा प्रयत्न कराल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आराेग्यविषयक समस्यांतून सुटल्यासारखे वाटेल. डाेकेदुखी, माेसमी आजार, व पाेटासंबंधित छाेटीमाेठी तक्रार राहण्याची शक्यता आहे. जर दीर्घकाळापासून आजारी असाल तर यावेळी तुम्ही जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
 
शुभदिनांक : 13, 14, 17 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल शुभवार :साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात शत्रू तणावाची स्थिती निर्माण करू शकताे वा काेणत्याही प्रकारच्या दुखापतीची शक्यता आहे. सावध राहावे.
 
उपाय : या आठवड्यात नियमितपणे भगवान शंकराची पूजा करावी. शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. कपाळावर केशराचा टिळा लावावा. वडाच्या मुळाशी दूध वाहावे व तेथील ओली माती कपाळी लावावी.