तूळ

    11-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्ही प्रत्येक बाबतीत विवेकाने पुढे जाल. विद्यार्थीवर्गात एकाग्रतेचा अभाव जाणवेल. शेअरबाजारात सक्रिय असलेल्या जातकांनी काेणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. स्थायी संपत्तीसंबंधित कामकाज पुढे वाढवण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. रागावर ताबा ठेवावा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात शेअर बाजार, व्याज, कमिशन आधारित कामांमध्ये विशेष फायदा हाेण्याची शक्यता आहे. जर उधारीत तुमचा पैसा बऱ्याच काळापासून अडकला असेल तर ताे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता राहील. व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास केल्यास यश मिळेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रियपात्रासाेबत संबंध अनुकूल राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्या-बाेलण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लहानसहान गाेष्टींमुळे वा गैरसमजांमुळे संबंधात काेणत्याही प्रकारचा तणाव उत्पन्न हाेऊ देऊ नये. प्रिय व्यक्तीसाेबत तुम्ही फिरायला जाऊ शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. भाैतिक सुख व पैसा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेपलीकडे प्रयत्न कराल व त्याचा परिणाम तुमच्या आराेग्यावर हाेईल. झाेपताना एक ग्लास गाेड काेमट दुधात एक चमचा शुद्ध तू घालून प्यायला हवे.
 
शुभदिनांक : 11, 12, 16 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : संपत्तीविषरयक काही मुद्दे तुम्हाला त्रस्त करू शकतात.
 
उपाय : या आठवड्यात गळ्यात अनंतमूळ धारण करावे. मंगळवारी रक्तदान करावे. मंगळवारी बागेत वा मंदिरात डाळिंबाचे झाड लावावे. दर गुरुवारी पिंपळाला स्पर्श न करता पाणी घालावे.