सिंह

    11-Oct-2020
Total Views |
एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात याल, ज्याचा फायदा तुम्हाला नजिकच्या भविष्यकाळात हाेईल. काैटुंबिक प्रकरणांत उत्पन्न हाेणारे अडसर तुमच्यासाठी चिंतेचा विषय हाेऊन राहतील. भागिदारीच्या कामात उशीर हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरीत बदल व बदली हाेण्याची शक्यता दिसत आहे. स्वत:ला काेणत्याही परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी तयार ठेवावे.नाेकरदारांना या काळात आपल्या सहकारी वा हाताखालील कर्मचाऱ्यांबाबत अनामिक भीती जाणवेल. प्रवास टाळणे इष्ट ठरेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक नात्याबाबत काळ अनुकूल आहे. तुम्ही काैटुंबिक वादापासून दूर राहण्याची गरज आहे. तुम्ही काैटुंबिक प्रकरणात समाधान आणण्याच्या नीतिवर लक्ष केंद्रित करावे व ते वाढवणे टाळावे. आई-वडिलांसाेबत उत्तम वागावे अन्यथा नात्यात कटुता येऊ शकते.
 
आराेग्य : या आठवड्यात रक्तदाबासंबंधित तक्रार राहू शकते. या काळात हृदयासंबंधित राेग व मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. तुम्हाला तुमच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. तुम्ही सतत स्वत:च्या आराेग्याचे निरीक्षण करावे. राेज लसणाच्या दाेन पाकळ्या, मेथ्या एक चमचा व लिंबू घ्यावे.
 
शुभदिनांक : 13, 14, 17 शुभरंग : पिवळा, गुलाबी, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरूवार
 
दक्षता : या आठवड्यात गाडी चालवताना सावध राहावे. बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखावे.
 
उपाय : या आठवड्यात माणकाचे वा साेन्याचे सूर्याचे लाॅकेट धारण करावे.वडिलांचा आदर करावा व त्यांची सेवा करावी. प्राचीन धार्मिक स्थळाची सफाई करावी. कुष्ठराेग्यांना औषधे वाटावीत. आदित्यस्ताेत्र वाचावे.