मिथुन

    11-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात तुमचे लक्ष उत्तम भाेजन, कपडे, मनाेरंजन, वैवाहिक सुख, भाेगविलासासाठी खरेदी करणे इ.वर जास्त केंद्रित राहणार आहे. तुम्ही स्वत:च्या मनावर व भावनांवर ताबा राखण्याची गरज आहे. हा आठवडा करियरच्या दृष्टिने उत्तम संधी देणारा आहे, पण पैशाबाबत प्रयत्न वाढवायला हवेत.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक कारभारात लाभ हाेण्याची श्नयता आहे. नाेकरदार जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार आहे. याेग्य संधी ओळखून तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. कृषी व त्यासंबंधित उत्पादनांच्या कारभारात फायदा हाेईल. विद्यार्थ्यांना जास्त श्रम घ्यावे लागतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही प्रेमसंबधांच्या प्रकरणात पुढे जायला हवे.प्रियजनांच्या भेटीत जास्त खर्च हाेण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला इतर संबंधातही सुधारणा झाल्याचे आढळून येईल. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसमाेर प्रेमाचा प्रस्ताव ठेवून सकारात्मक उत्तराची अपेक्षा करू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत नरमगरम राहण्याची शक्यता आहे.अंगात छाेटेमाेठे त्रास हाेऊ शकतात. तसेच तुम्ही मानसिक दृष्ट्याही त्रस्त हाेऊ शकता. या काळात दुखापत हाेण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहावे. मानसिक अस्वस्थता घालवण्यासाठी याेग व ध्यान करा.
 
शुभदिनांक : 11, 12, 16 शुभरंग : लाल, पिवळा, काळा शुभवार : साेमवार, गुरुवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणालाही खाेटे आश्वासन देऊ नये अन्यथा भविष्यात तुम्हाला त्रास हाेऊ शकताे.
 
उपाय : या आठवड्यात नित्यनेमाने श्रीविष्णू सहस्रनाम स्राेत्राचा पाठ करावा.भावा-बहिणींना व कुटुंबातील लाेकांना मदत करावी. किन्नरांचा आशीर्वाद घ्यावा.रविवाी भैरवमंदिरात दूध वाहावे.