मेष

11 Oct 2020 11:57:47
हा आठवडा तुमच्या आराेग्यात, लाभात आणि मान-सन्मानात वाढ करणारा आहे.कार्यक्षेत्रावर तुम्ही कठाेर परिश्रम कराल आणि मनाजाेगे परिणाम मिळवण्यातही यशस्वी राहाल. वरिष्ठ तुमची मदत करतील, पण सध्या त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षाही जास्त राहतील. त्यामुळे थाेडे सावध राहा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायातील बाबींमध्ये धैर्य राखत पुढे जा.जसजसा वेळ जाईल तसतशी तुम्हाला दूर राहणाऱ्या आयात-निर्यातीच्या व्यवसायात असलेल्या परिचितांची मदत मिळेल. त्यांच्यासाेबत सावधपणे पुढे जा. स्पर्धापरीक्षा व डिस्टन्स लर्निंगसाठी ही वेळ उत्तम आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या ग्रहस्थितीनुसार तुम्हाला घर व कुटुंबापासून काही काळ दूरही राहावे लागू शकते. कुटुंबासाेबत सुख-दु:खाचे क्षण घालवण्याची संधी तुम्हाला कमीच मिळणार आहे. व्यस्ततेमुळे तुमच्या खाण्याच्या वेळांवरही परिणाम हाेईल आणि तुमची तब्बेत थाेडी नरम राहू शकते.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या आराेग्यात चढ-उतार पाहायला मिळेल. जे जातक दीर्घकाळापासून आजारी आहेत त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्याचे आढळून येईल.तुम्हाला तुमच्या आराेग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. तब्बेतीबाबत तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
 
शुभदिनांक : 13, 14, 17 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात काही गाेष्टी सांभाळायला हव्यात. उदा. विचारपूर्वक बाेलणे, गैरसमज न बाळगणे, संशय घेणे टाळणे.
 
उपाय : या आठवड्यात राेज तांब्याच्या भांड्याने सूर्याला अर्घ्य द्यावा. उत्तम परिणामासाठी बेलाचे मूळ धारण करावे. राेज पहाटे उठण्याचा प्रयत्न करावा आणि अस्त हाेणारा तांबडा सूर्य पाहावा. शुक्रवारी कुमारिकांना खडीसाखर व खीर खाण्यास द्यावी.
Powered By Sangraha 9.0