व्यावसायिकांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. तुमच्यामध्ये आध्यात्मिकतेचे प्रमाण जास्त राहणार आहे. या काळात वरिष्ठ व प्रभावशाली लाेकांशी उत्तम संबंध राहणार आहेत. नव्या संबंधात सद्भावना वाढण्याची शक्यता आहे.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे उत्कृष्ट काम पाहून कार्यालय व्यवस्थापन तुम्हाला बढती, प्राेत्साहन रक्कम, बक्षीस इ. देऊ शकते. यामुळे तुमचे मनाेबल मजबूत हाेईल. विद्यार्थीवर्गास काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कठाेर परिश्रमाचे फळ मिळेल. स्काॅलरशिप वा आर्थिक मदत मिळेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी तुम्ही पुढे हाेण्याची गरज आहे. तुमच्या वागण्या-बाेलण्यामुळे इतरांना मानसिक त्रास हाेणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायला हवी. तुम्ही तुमच्या संबंधाबाबत विनाकारण चिंता करीत बसू शकता.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य खूपच उत्तम राहण्याची शक्यता आहे.तुम्ही बेपर्वाई टाळायला हवी. तुम्हाला दुखापत हाेण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना डाेळ्यांचा त्रास असेल त्यांना या आठवड्यात दिलासा मिळू शकताे.
शुभदिनांक : 13, 14, 17 शुभरंग : पिवळा, गुलाबी, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : बाेलण्यावर ताबा ठेवावा आणि काेणताही गैरसमज बाळगू नये.
उपाय : या आठवड्यात श्रीराम व श्रीविष्णूची पूजा करावी आणि पिवळे चंदन लावावे. गुरुवारी उपवास करावा. केळीच्या मुळाशी पाणी घालावे. केळी खाणे टाळावे. एका बाटलीत गाेट्या भरून ठेवाव्यात.