हा आठवडा आर्थिक आणि वैवाहिक सुखाबाबत खूपच उत्तम असणार आहे.तुम्हाला जाेम आणि उत्साह जाणवत राहील, पण त्याचा याेग्य वा अयाेग्य दिशेने वापर करणे तुमच्या हातात असेल. ज्येष्ठांसाेबत नम्रतेने वागावे अन्यथा तुमच्या संबंधात तणाव उत्पन्न हाेऊ शकताे.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदार जातकांनी सावध राहून काम करण्याची गरज आहे. कारण विराेधक काेणत्याही प्रकारची चाल चालू शकतात.शेअर व सट्टा बाजारात गुंतवणूक करणाऱ्या जातकांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. तरच त्यामध्ये त्यांना लाभ हाेऊ शकताे.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रियजनांना वारंवार भेटावेसे वाटत राहील. तुमची भेट यशस्वी हाेण्याचीही श्नयता आहे. तुम्हाला मनाेमन प्रेम, सुख व आत्मीयतेची जाणीव हाेईल. एखाद्या नव्या ठिकाणी भेट हाेईल.मित्रांसाेबत तुमचे असलेले संबंध अधिक मजबूत हाेण्याची श्नयता आहे.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य नरमगरम राहण्याची शक्यता आहे.तुम्ही बाहेरचे खाणे टाळायला हवे. तुम्हाला तुमच्या अंगात जाेम आणि उल्हास दाेन्ही जाणवेल. माेसमी आजारांपासून सावध राहावे.
शुभदिनांक : 11, 12, 16 शुभरंग : गुलाबी, लाल, पिवळा शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : तुमचे संबंध गुप्त ठेवा अन्यथा तुमचा मान कमी हाेऊ शकताे.
उपाय : नित्यनेमाने शनिवारी पिंपळाच्या मुळाशी पाणी वाहावे. धाेत्र्याचे मूळ धारण करावे. शनिवारी सायंकाळी माेहरीच्या तेलाचा दिवा लावावा. श्रद्धापूर्वक गरजूंना दान करावे. राेज श्रीगणेशाची पूजा करावी.