या आठवड्यात तुमच्या शत्रूंचा नाश हाेईल. आनंद व मानसिक सुख-शांती लाभेल व लक्ष्मीची कृपा हाेईल. तुमच्या स्नानाच्या पाण्यात तीर्थाचे जल मिसळावे. काैटुंबिक सुख व मान वाढेल. शेती व जमिनीसंबंधित कामांमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ हाेण्याची शक्यता आहे.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदार व्यक्तींना पैसा कमावण्याची सुवर्णसंधी लाभेल, तसेच दुसरीकडे खर्च कमी केल्यामुळे बचतीचे प्रमाणही वाढेल.या काळात व्यवसायानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरणार आहे. जे नाेकरीत बदल करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात चढ-उतार हाेण्याची शक्यता खूपच कमी आहे. शक्य असल्यास प्रत्येक संबंधाशी संवाद साधण्यावर जास्त भर द्यावा. यामुळे संबंध कायम जुळलेले राहू शकतील.
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आळस, अशक्तपणा व सुस्ती जाणवण्याची शक्यता आहे. आजारावर जास्त पैसा खर्च हाेण्याची शक्यता आहे. आराेग्याबाबत जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुलांची व जाेडीदाराची तब्बेत उत्तम असल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल.
शुभदिनांक : 11, 12, 17 शुभरंग : हिरवा, काळा, लाल शुभवार : रविवार, बुधवार, गुरुवार
दक्षता : या आठवड्यात तुमच्या यशाचा मत्सर करणाऱ्या लाेकांवर रागावू नका तर त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करा.
उपाय : या आठवड्यात करियरमध्ये यश मिळवण्यासाठी राेज आदित्य स्त्राेत्र वाचा. निळ्या फुलांनी सरस्वतीदेवीची आराधना व प्रार्थना करा.