कर्क

    11-Oct-2020
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या खूप उत्तम राहण्याची शक्यता आहे.नाेकरदार जातकांसाठी काळ खूपच अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नव्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागू शकतात. विद्यार्थ्यांना मनाजाेगा निकाल मिळवण्यासाठी खूप श्रम करावे लागतील. संततीकडून शुभवार्ता समजू शकते.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे मन इतर कामांत जास्त रुची घेईल, ज्यामुळे तुमचे विद्याभ्यासाकडे जास्त लक्ष लागणार नाही. स्पर्धापरीक्षेची तयारी करीत असाल तर जास्त मेहनत करण्याची गरज आहे. उत्पन्न व संपत्तीत वाढ हाेण्याची श्नयता आहे. सेल्स व मार्केटिंगवाल्यांना जास्त हिंडावे लागेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुम्ही प्रेमसंबंधाच्या सुंदर जगाचा प्रवास करीत आहात असे वाटेल. प्रेमसंबंधासाठी अनुकूल काळ आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडू शकता. डेटिंगवर जाण्यासाठीही उत्तम काळ आहे. तुमच्या प्रेमसंबंधात विराेधक आडवे येऊ शकतात हे लक्षात ठेवून राहावे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमचे आराेग्य उत्तम असल्याची जाणीव हाेईल.तुमच्यामध्ये जाेम आणि उत्साह राहील. जाेडीदाराची तब्बेत तुमच्या चिंतेचा विषय ठरू शकताे. तब्बेतीबाबत निष्काळजी राहू नका.
 
शुभदिनांक : 13, 14,17 शुभरंग : हिरवा, नारंगी, पिवळा शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : फालतू गाेष्टी व भांडणापासून दूर राहा. निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.
 
उपाय : या आठवड्यात गरजूंना ब्लॅकेट वाआ. गळ्यात अश्वगंधाचे मूळ धारण करावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. श्रद्धा-भक्तीने शिवाची पूजा करावी. कुत्र्यांना खाणे द्यावे. शनिवारी उडीद, काळे कापड, माेहरीचे तेल, लाेखंड, लाकूड, काेळसा दान करावे.