धनु

    11-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी व वडीलघारी तसेच इतर लाेकांचे सहकार्य मिळू शकते. सर्वांशी नम्रतेने वागावे. काही अडचणींचा सामना करावा लागू शकताे.या काळात परिचितांकडून फायद्याची अपेक्षा बाळगू शकता. तुम्ही नेटाने व धैर्याने काम पुढे न्याल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासासंबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करावे आणि मित्रांसाेबत विनाकारण फिरणे टाळावे. अन्यथा तुमच्या शिक्षणावर दुष्परिणाम हाेऊ शकताे. व्यावसायिकांचा आर्थिक ओघ संथ गतीने असेल. शेअरबाजारात काही करण्यापूर्वी फायदा-ताेटा पाहावा.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमचे प्रेमसंबंध मधुर राखण्यासाठी आपल्या बाेलण्या-वागण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असेल. भावासाेबत एखाद्या बाबीवर चर्चा हाेण्याची श्नयता आहे. यावेळी तुमच्या संदिग्ध बाेलण्यामुळे गैरसमज निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आराेग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. डाेळ्यांसंबंधित समस्या जाणवत असतील तर डाेळे वेळीच तपासून घ्यावेत.या आठवड्यात काही कारणामुळे तुम्हाला दुखापत हाेण्याची श्नयता आहे. याबाबत सावध राहण्याची आवश्यकता आहे.
 
शुभदिनांक : 13, 14, 17 शुभरंग : पिवळा, गुलाबी, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात व्यावसायिकांनी त्यांचा पैसा चुकीच्या जागी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाची नियमितपणे पूजा करावी व दुर्वा व माेदक अर्पण करावेत. श्रीगणपती अथर्वशीर्ष स्राेताचा पाठ करावा.