जगप्रसिद्ध अद्भुत अजिंठा

10 Oct 2020 10:58:57

ertyu_1  H x W: 
 
अजिंठा येथील लेण्या स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. या ठिकाणी एकूण 29 लेण्या आहेत. या सर्व लेण्या वाघूर नदीच्या आसपास विखुरलेल्या असून, नदीच्या पात्रापासून 15-30 मीटर उंचीवर कातळात आहेत. ही लेणी वाकाटक चालुक्य आणि राष्ट्रकूट या काळात निर्मिली गेली, असं म्हटलं जातं. पुरातत्त्व शास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दाेन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. त्यातील नऊ, दहा, बारा, तेरा आणि पंधरा-अ या लेण्या हीनयान कालखंडात काेरल्या गेल्या असाव्यात. हा कालखंड साधारणत: इ.स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांमध्ये स्तूप असून त्या स्तूप रूपांमधून बुद्धांचे दर्शन हाेते. नऊ आणि दहा क्रमांकाची लेणी चैत्यगृह आहे. तर बारा, तेरा आणि पंधरा-अ ही लेणी विहार आहेत. वर सांगितलेल्या क्रमांकाच्या लेण्या साेडून 1 ते 29 क्रमांकांची लेणी साधारणत: 800-900 वर्षांनंतर म्हणजे इ.स.च्या सहाव्या आणि सातव्या शतकाच्या आसपास म्हणजे महायान कालखंडात निर्माण केली आहे. या लेण्यांमधून गाैतम बुद्धांचे सर्वसामान्य लाेकांना परिचित असलेलं रूप दिसून येतं. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली. त्यामुळे या लेण्यांना वाकाटक लेणी असंही संबाेधलं जातं.
Powered By Sangraha 9.0