आपत्कालीन भारनियमन टाळण्यास कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात

पालक मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश : पूर्वसूचना देऊन भारनियमन करावे

    08-Sep-2026
Total Views |

veej 
साेलापूर, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन भारनियमनामुळे नागरिक व कृषी पंपधारक शेतकऱ्यांना हाेणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाचे याेग्य नियाेजन करावे. भारनियमनाची आवश्यकता असल्यास नागरिकांना पूर्वसूचना द्यावी; तसेच आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश साेलापूरचे पालक मंत्री जयकुमार गाेरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
 
जिल्ह्यातील भारनियमनाच्या तक्रारींबाबत गाेरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, अतिर्नित कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित हाेते. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या भारनियमनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मागील दाेन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन केल्याची माहिती अधीक्षक अभियंत्यांनी दिली. यावर गाेरे यांनी नाराजी व्य्नत केली. आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी आवश्यक उपाययाेजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. भारनियमन करणे अपरिहार्य असल्यास त्याची पूर्वसूचना वीज ग्राहकांना द्यावी.
 
भारनियमनाचा कालावधी आणि त्यामागील कारणांची माहिती नागरिकांना मिळेल याची दक्षता घ्यावी, असे गाेरे यांनी सांगितले. पंढरपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत गाेरे यांनी तीव्र नाराजी व्य्नत केली. संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नाेटीस बजावून त्याच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.