गोंदवलेकर महाराज

संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे

    08-Sep-2026
Total Views |

GondavlekarMaharaj 
आयुष्यात संगतीला ार महत्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत हाेत असताे. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गाेष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहताे. समजा, काही लाेकांनी इथे यायचे ठरवले.
 
एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चाैथा माेटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच माेटारीने येणारा सर्वांत लवकर पाेहाेचेल; म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की, ज्याच्या संगतीत आपण जाताे त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लाेप पावते.
 
इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, तर कुणी डाॅक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली. त्या मुली ारशा शिकलेल्या नसतील; परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डाॅक्टरशी लग्न केलेली डाॅक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर सत्संगतीचा परिणाम किती हाेत असला पाहिजे! आपण तिकीट काढून गाडीत बसताे. आपल्या शेजारी काेण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. ताे विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन हाेत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते.
 
व्यसनी किंवा विषयी माणसाची संगतही अशी तापदायक, घातक असते. उलट, सत्पुरुषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्भावना आणि सद्विचार प्राप्त हाेतात. एखादा साधू बैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, ताे स्वत: उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील.
 
समर्थांच्याकडे कुणी गेला तर ते म्हणतील,‘मी भिक्षेची झाेळी घेताे, तूही घे; दाेघेही भिक्षा मागून आणू, आणि जे मिळेत ते शिजवून खाऊ’ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाराला ताे वाटेल ते करून खायला घालील.
 
अन्नानुसार वासना बनते, म्हणून संताघरचे अन्न मागूनदेखील घेऊन खावे. परंतु संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. ताे रहात असेल तिथून आपण लांब राहात असू; आणि जवळ राहात असलाे तरी प्रपंच कामधंद्यामुळे चाेवीस तासात त्याच्या सान्निध्यात कितीसे राहाता येणार ? मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल ? तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदासर्वकाळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत हाेय.