अनेकदा आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय हा प्रश्न पडताे. प्रत्येक माणसाची जन्मापासून अशी वृत्ती बनत जाते की, हा देह म्हणजेच मी आहे. देह सुखी तर मी सुखी आणि देहाचे सुख मिळावे व ते वाढते असावे म्हणून अनेक वस्तूंचा संग्रह करीत राहावे ही प्रवृत्ती हाेय. यामुळे माणूस देहापलीकडे आपला आत्मा म्हणून काही चिरंतन वस्तू आहे हे विसरूनच जाताे.
निवृत्ती म्हणजे देह हा सर्वस्व नव्हे; देह चालविणारा काेणीतरी आहे आणि ताे काेणीतरी म्हणजे आपला जीव म्हणजेच आत्मा आहे याचे ज्ञान हाेऊन दृश्य ऐहिक गाेष्टींबदल औदासिन्य येणे हाेय. थाेड्नयामध्ये दृश्य वस्तुमात्रांची नश्वरता समजणे व अदृश्य अशा चिरंतन सत्याचा शाेध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच विरक्ती हाेय. विरक्ती ही साधनेच्या प्रगतीनंतरच प्राप्त हाेते. मात्र विरक्ती हे अंतिम साध्य नव्हे तर आत्मनिवेदन या अंतिम ध्येयाच्या पूर्ती शिखराजवळ असलेला शेवटचा टप्पा हाेय हे लक्षात घेणे जरूर आहे.
जग मिथ्या आहे हे समजले म्हणजेच विरक्ती येते व नंतर केवळ ब्रह्मच सत्य आहे हे जे ज्ञान हाेते ते आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ हाेय. एक जुनी कथा आहे. एका राजाचा ऐहिक सुखावरच पूर्ण भरवसा हाेता.
त्याला एक सद्गुरू भेटले. त्यांनी सांगितले की माझे गुरू स्वर्गवासी झाले आहेत. त्यांनी काल स्वप्नात येऊन सांगितले की, माझा अंगरखा फाटला आहे ताे शिवायला स्वर्गात सुई मिळत नाही तरी ती तू पाठवून दे.