मुंबई, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या साेने न खरेदी करण्याच्या दुसऱ्या आवाहनानंतर दिल्लीसह देशभरातील साेने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. ज्वेलर्स, सुवर्णकार, कारागीर आणि छाेट्या किरकाेळ (रिटेल) व्यापाऱ्यांना भीती आहे की, या आवाहनामुळे ग्राहकांची खरेदी प्रभावित हाेईल आणि विशेषतः आगामी लग्नसराईच्या हंगामात (वेडिंग सीजन) दागिन्यांच्या मागणीत माेठी घसरण हाेऊ शकते. व्यापारी संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचा असा अंदाज आहे की, देशातील साेन्याचा वार्षिक वापर 700- 800 टनांवरून घटून सुमारे 500 टनांपर्यंत पाेहाेचू शकताे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 10 मे 2026 राेजी हैदराबाद येथील एका रॅलीदरम्यान देशवासीयांना एक वर्षासाठी साेने खरेदी करणे टाळण्याचे आवाहन केले हाेते. आता पुन्हा एकदा पंतप्रधानांकडून गैर-गरजेचे साेने न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर ज्वेलरी आणि साेन्याच्या व्यवसायाशी जाेडलेले व्यापारी व कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिल्ली आणि देशातील व्यापारी व उद्याेजकांची सर्वाेच्च संघटना सिटीआयचे चेअरमन ब्रिजेश गाेयल यांनी सांगितले, की पंतप्रधानांच्या दुसऱ्या आवाहनानंतर ज्वेलरी इंडस्ट्रीशी जाेडलेल्या शेकडाे व्यापाऱ्यांनी आपली चिंता संघटनेसमाेर मांडली आहे.
भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात माेठा साेन्याचा वापरकर्ता देश आहे. देशात दरवर्षी सुमारे 700 ते 800 टन साेन्याचा वापर हाेताे. संघटनेचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हा वापर घटून सुमारे 500 टनांपर्यंत राहू शकताे. व्यापाऱ्यांचे मत आहे की, साेन्याच्या खरेदीबाबत अशा प्रकारच्या सार्वजनिक आवाहनामुळे ग्राहकांमध्ये किमतींबद्दल अनिश्चितता आणि भीती निर्माण हाेते. याचा थेट परिणाम विक्रीवर हाेऊ शकताे. गाेयल यांनी सांगितले, की पंतप्रधानांनी हे आवाहन अशा वेळी केले आले आहे, जेव्हा ऑक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये लग्नांचा हंगाम सुरू हाेणार आहे आणि कुटुंबांनी याची खरेदी आत्तापासूनच सुरू केली आहे. अशा वेळी साेन्याच्या खरेदीबाबत लाेकांमध्ये निर्माण झालेली संभ्रम स्थिती ही दागिन्यांच्या मागणीवर परिणाम करू शकते. सण आणि लग्नसराईच्या आधीच विक्री मंदावल्याने ज्वेलरी इंडस्ट्रीवरील दबाव आणखी वाढू शकताे, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.
काही रिटेलर्सचे म्हणणे आहे की, गेल्या 7 ते 10 दिवसांत त्यांच्याकडे एकही ग्राहक आलेला नाही. ग्राहकांमध्ये असा समज निर्माण हाेत आहे की येत्या काळात साेन्याचे दर खाली जाऊ शकतात. याच कारणामुळे लाेक अंगठी आणि कानातले यांसारखी लहान खरेदीसुद्धा टाळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, विक्री मंदावल्यामुळे अनेक रिटेल विक्रेत्यांनी नवीन स्टाॅक घेणे आणि नवीन ऑर्डर्स देणेही थांबवले आहे. यामुळे बाजारात मंदी आणि निराशेचे वातावरण तयार हाेऊ लागले आहे.
ज्वेलरी व्यापाऱ्यांनी सांगितले की पहिल्या आवाहनानंतर व्यवसाय प्रभावित झाल्याचा परिणाम कारागिरांच्या दैनंदिन जीवनावरही झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी कधीही असे ऐकायला मिळाले नव्हते की साेन्याचा कारागीर ई-रिक्षा चालवण्यास किंवा कुलचा-छाेले विकण्यास भाग पडला आहे, परंतु पहिल्या आवाहनानंतर अशी प्रकरणे समाेर आली आहेत. दुसऱ्या आवाहनानंतर राेजगारावरील दबाव आणखी वाढू शकताे, अशी चिंता व्यापाऱ्यांना आहे.