मिरा-भाईंदरच्या डिजिटल कचरा व्यवस्थापनाची राष्ट्रीय स्तरावर दखल

महापालिका राष्ट्रीय परिषदेत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांचे सादरीकरण

    08-Sep-2026
Total Views |
 
wastemanagement
भाईंदर, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
मिरा-भाईंदर महापालिकेच्या डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान- शहरी 2.0 अंतर्गत स्वच्छ आणि आदर्श शहरांची निर्मिती या विषयावर आयाेजित राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मिरा-भाईंदर महापालिकेने केले. या परिषदेत महापालिका आयु्नत राधाबिनाेद शर्मा यांनी मिरा-भाईंदरमधील कचरा व्यवस्थापनाचे अनुभव आणि भविष्यातील नियाेजन मांडले.
 
या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून सहभागी हाेण्याचे निमंत्रण मिळालेले आयु्नत राधाबिनाेद शर्मा हे एकमेव महापालिका आयु्नत हाेते. देशातील शहरे स्वच्छ आणि भविष्यातील आव्हानांना सामाेरे जाण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययाेजनांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. यावेळी मिरा-भाईंदर महापालिकेच्या डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट प्रक्रियेवर तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रभावी देखरेख ठेवता येते. राज्यातील अन्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही प्रणाली आदर्श ठरत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.