आपले हृदय राेज सुमारे 1,15,000 वेळा धडधडते आणि 2000 गॅलन रक्त पंप करते. हा शरीराचा सर्वांत जासत परिश्रम करणारा स्नायू आहे. त्यामुळे याची विशेष देखभाल करणेही गरजेचे आहे. हृदयाच्या आराेग्याशी काेणते पैलू आहेत जे चाळीशीनंतर विशेष लक्षात ठेवायला हवेत ते पाहू.
काय करावे :वजन कमी करण्यासाठी असे छाेटे छाेटे लक्ष्य बनवावे जे आपण दीर्घकाळ पाळू शकाल. उदा. आठवड्यात अर्धा किलाे वजन कमी करण्याचे लक्ष्य. वा राेज 15मिनिटे जादा चालणे.
जास्त नसावा कंबरेचा घेर
वजनापेक्षाही जास्त गरजेचे हे आहे की, आपल्या शरीरात चरबी काेठे साचत आहे. विशेषज्ञांच्या मते पाेटाच्या आजुबाजूला चरबी जास्त असणे हृदयासाठी सर्वांत जास्त घातक असते.
आदर्श नंबर : पुरुषांसाठी 40 इंचांपेक्षा कमी व महिलांसाठी 35 इंचांपेक्षा कमी.
काय करावे : जर पुरुषांची कंबर 40 व महिलांची 35 इंचापलिकडे जात असेल तर आपल्याला आपली फिटनेस रणनीती बदलण्याची खूप गरज आहे.
जर आपण सायकल चालवत असाल वा चालत असाल तर दाेन मिनिटे साध्या वेगात, नंतर पुढील एक मिनिट पूर्ण वेगात धावा वा पॅडल मारा. पुन्हा सामान्य वेगात या.
आरामाचा वेळ हृदयाची धडधड
आपले हृदय दर मिनिटाला सुमारे 60 वेळा धडधडते. तर सशाचे हृदय दर मिनिटाला 200 वेळा धडकते. याच कारणामुळे सशाचे आयुष्य कमी असते.
अर्थात जेव्हा आपण आराम करीत असाल तेव्हा आपले हृदय जेवढे सावकाश धडकेल ते तेवढेच मजबूत मानले जाईल.
आपले आयुष्य तेवढेच प्रदीर्घ असेल.
आदर्श नंबर : शांत बसल्यानंतर आपले सामान्य हृदयठाेके दर मिनिटाला 60 ते 100 असायला हवेत. हे तपासण्यासाठी 5 मिनिटे शांत बसा. आपल्या मनगट वा मानेवर बाेट ठेवून 15 सेकंद ठाेके माेजा.
व त्याला चारने गुणा.
काय करावे : वेगाने चालणे, पाेहणे आणि सायकल चालवणे असे कार्डियाे व्यायाम करा. व्यायामाच्या वेळी ठाेके अवश्य वाढतात पण हळू हळू आपले हृदय एवढे मजबूत हाेते की, आरामाच्या वेळी अत्यंत कमी श्रमात संपूर्ण शरीराला भरपूर रक्त पाेहाेचू लागते. यामुळे हृदयाचे आयुष्य वाढते.