गडचिरोलीतील पोलाद प्रकल्पाचा मार्ग मोकळा

राज्य सरकार व जॉन कॉकरिलमध्ये सामंजस्य कराराची देवाणघेवाण

    08-Sep-2026
Total Views |

sarkar 
मुंबई, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्य सरकार व जाॅन काॅकरिल इंडिया लिमिटेड कंपनीदरम्यान 2 सप्टेंबरला झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने येथे भारत- बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान सामंजस्य कराराची औपचारिक देवाणघेवाण झाली. गडचिराेलीत हरित लाेह व हरित पाेलाद तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण आहे.
 
या कार्यक्रमास बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डे वेव्हर, केंद्रीय वाणिज्य व उद्याेग मंत्री पीयूष गाेयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; तसेच राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आणि प्रवासी भारतीय कार्य मंत्री रावल उपस्थित हाेते. प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि राजशिष्टाचार विभागाचे सचिव डाॅ. राजेश गवांदे, तर जाॅन काॅकरिल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन-ल्युक माॅरांज आणि जाॅन काॅकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक फ्रेडरिक मार्टिन यांनी सामंजस्य कराराच्या प्रतींची देवाणघेवाण केली.