6. शरीर आणि आत्मा ः आत्म्याशिवाय शरीरात चैतन्याचा संचार हाेऊ शकत नाही; परंतु हा आत्मा साध्या चक्षूंनी नव्हे तर अंतश्चक्षूंनी पाहायला मिळताे. सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून मी काेण? (‘काेऽहं’) याचे उत्तर शाेधल्यास ‘ताे मीच’ (साेऽहं) हे उत्तर मिळते. ‘ताे’ म्हणजे परमात्मा. त्याचाच अंश म्हणजे आपला आत्मा हाेय; परंतु हा बाेध सहज हाेत नाही.
बाेध : आत्माभिमुख हाेऊन (अंतर्मुख हाेऊन) तना-मनावर, इंद्रियांवर विजय मिळविण्याचे कठाेर व्रत केल्यानंतरच या शरीरस्थित आत्म्याचा साक्षात्कार हाेऊ शकताे.