नवी मुंबई विमानतळावर अवतरले 'अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान'

विमानतळावर स्वागत : अबुधाबीहून ४६ टन माल आणला

    07-Sep-2026
Total Views |
 
aeroplane
नवी मुंबई, 6 सप्टेंबर (आ.प्र.) :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) जगातील सर्वांत माेठ्या मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या ‘अँटाेनाेव्ह एएन-124 रुस्लान’चे नुकतेच आगमन झाले. अबुधाबीहून सुमारे 46 टन माल घेऊन आलेल्या या महाकाय विमानामुळे विमानतळाची अवजड मालवाहतुकीसाठीची क्षमता अधाेरेखित झाली आहे.
 
अँटाेनाेव्ह एएन-124 हे विशेषतः माेठ्या आकाराचा आणि अवजड माल वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे विमान आहे. त्याचा पुढील भाग उघडता येताे.
 
त्यामुळे पारंपरिक मालवाहू विमानांच्या तुलनेत माेठ्या यंत्रसामग्रीसह अवजड आणि माेठ्या आकाराच्या वस्तूंची वाहतूक करणे सुलभ हाेते. काेड एफ श्रेणीतील हे रुंद आकाराचे मालवाहू विमान अवजड, आकाराने माेठ्या आणि विशेष स्वरूपाच्या मालाची वाहतूक करण्यासाठी सक्षम आहे. असे हे महाकाय विमान नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्य्नत केला; तसेच या विमानाचे जाेरदार स्वागत केले.
 
नवी मुंबई विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना विशेष विमानांच्या आगमनामुळे बळ मिळणार आहे. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील उद्याेग, लाॅजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व या क्षेत्रातील अभ्यासकांची व्य्नत केले आहे.