उरण, 6 सप्टेंबर (आ.प्र.) :
जेएनपीए बंदरातील मालवाहतूक 13.06 ट्न्नयांनी वाढल्याने जगातील 30 प्रमुख बंदरांत 28 व्या स्थानावरून 21व्या स्थानी या बंदराने झेप घेतली आहे. देशातील सर्वात माेठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पाेर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या 2026च्या पहिल्या सहामाहीतील जगातील प्रमुख 30 कंटेनर बंदरांच्या आढावा अहवालात ही झेप घेतली आहे.
गेल्या वर्षभरात कार्यात्मक कार्यक्षमता, जलद मालवाहतूक व निर्गमन, जहाज हाताळणीतील सुधारणा आणि बहुविध वाहतूक जाेडणी अधिक सक्षम करण्यावर जेएनपीएने सातत्याने भर दिला आहे.
2026च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकाइराण संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसमाेर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही जेएनपीएने मालाची अखंडित वाहतूक करण्यासाठी प्रभावी उपाययाेजना राबवल्या. वाढलेल्या कार्यात्मक गरजांचे सक्षम व्यवस्थापन करत आयात-निर्यात व्यापाराची गती आणि सातत्य कायम ठेवण्यात जेएनपीए यशस्वी ठरले.
आव्हानात्मक परिस्थितीतही व्यापार सुरळीत ठेवण्याची जेएनपीएची कार्यक्षमता आणि तत्परता ही जागतिक दर्जाच्या बंदरसेवांच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे द्याेतक आहे.
जेएनपीएने जागतिक क्रमवारीत 21वे स्थान मिळवणे हे आमच्या टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक व्यापारातील वर्षभरातील आव्हानात्मक परिस्थितीतही विश्वासार्ह आणि कार्यक्षम सेवा देण्याची जेएनपीएची क्षमता अधिक बळकट झाली आहे. या गतीला पुढे नेत जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे स्थान आणखी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे जेएनपीए अध्यक्ष गाैरव दयाल यांनी सांगितले.