कोल्डड्रिंक्स, चेहऱ्याची निगा राखणाऱ्या उत्पादनांची विक्री सर्वात जास्त

    07-Sep-2026
Total Views |

colddrink 
संध्यानंद.काॅम
देशातील ्निवक काॅमर्स वेगाने पारंपरिक ई- काॅमर्सला मागे टाकत आहे. इ्निवरस कॅपिटलच्या जून 2026 कंझ्युमर से्नटरच्या रिपाेर्टनुसार भारताच्या डिजिटल काॅमर्स बाजारपेठेचा अंदाज 2026 मध्ये 8 लाख काेटी रुपयांइतका आहे. त्यामध्ये ्निवक काॅमर्सचा वाटा 1.08 लाख काेटी रुपये आहे. सर्वात विशेष गाेष्ट ही आहे की, ्निवक काॅमर्स वर्षाला 40% वेगाने वाढत आहे. जी वाढ संपूर्ण डिजिटल काॅमर्सच्या वाढीच्या वेगाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे.
 
ब्लिंकिट, इंस्टामार्ट आणि झेप्टाेसारख्या प्रमुख कंपन्यांच्या डार्क स्टाेअरच्या नेटवर्कमध्ये मागील एका वर्षात माेठा फायदा झाला आहे. मे 2025 मध्ये या तीन कंपंन्यांची मिळून 3,405 डार्क स्टाेअर हाेती. ती मे 2026 मध्ये वाढून 5,026 झाली. म्हणजे केवळ एका वर्षात डार्क स्टाेअरची संख्या सुमारे दीडपट वाढली आहे.
 
हा आक्रमक विस्तार सांगताे की, कंपन्या लहान शहरे आणि नवीन प्रदेशांमध्ये वेगाने पाय पसरत आहेत, ज्यामुळे 10-15 मिनिटांत डिलिव्हरीचे आश्वासन पूर्ण करता येऊ शकेल. रिपाेर्ट नुसार आइसक्रीम, काेल्डड्र्निंस आणि चेहऱ्याची निगा राखणारी फेस केअर उत्पादने ्निवक काॅमर्सच्या प्लॅटफाॅर्मवर सर्वात जास्त वाढ दाखविणाऱ्या कॅटॅगरीत आहेत. उन्हाळ्यात या उत्पादनांची मागणी स्वाभाविकपणे वाढते. पण ्निवक काॅमर्सने ही मागणी त्वरित पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. ज्यामुळे पारंपरिक रिटेल चॅनल्सवर दबाव वाढला आहे.
 
कमकुवत माॅन्सूनमुळे ग्रामीण भागातून हाेणारी मागणी कमी हाेण्याचा धाेका? ग्राहकांसाठी एक चिंतेची बातमी सुद्धा आहे. रिपाेर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 4 जून ते 22 जूनच्या दरम्यान देशात सामान्य 97.6 मिलिमीटरच्या तुलनेत फ्नत 53.1 मिमी पाऊस झाला. म्हणजे 46% माेठी कमी. त्यामुळे जून 2026 मागील 146 वर्षांमध्ये सर्वात काेरड्या महिन्यांमध्ये सामील झाला आहे. अ‍ॅनालिस्ट्सचे मानणे आहे की, अल नीनाेची स्थिती आणि कमकुवत माॅन्सून ग्रामीण भागातील उत्पन्न आणि मागणी यांवर विपरीत परिणाम करू शकते. ताे एफएमसीजी खपाचा महत्त्वाचा आधार आहे.