चाणक्यनीती

    05-Sep-2026
Total Views |

Chankya 
3. लाकडात अग्नी ः वाळ्नया फांदीचे दुसऱ्या फांदीवर घर्षण झाल्यास अग्नीची ठिणगी पडते, फांद्या पेटतात.
म्हणजे मुळात लाकडात अग्नी असताे.
 
4. दुधात तूप ः दूध उकळून थंड केल्यास त्यावर जी साय (मलई) येते, त्यामध्ये तूप असते. या सायीला विरजण घालून त्याचे दही बनवून ते घुसळल्यास लाेणी मिळते. हे ‘नवनीत’ तापविल्यानंतर पाैष्टिक, साजूक तूप व बेरी मिळते.
 
5. उसात गूळ ः ऊस अत्यंत गाेड असताे. ताे चरकातून काढल्यानंतर ‘गाेड रसाची’ प्राप्ती हाेते. या रसावर उकळून प्रक्रिया केल्यास गूळ मिळताे. ताे गाेड आणि अत्यंत गुणकारी असताे. ‘जब पिसा जाता इक्षूदंड बहती रसकी धारा अखंड। जब मेहंदी सहती है प्रहार बनती ललनओका सिंगार।’ असे जयशंकर प्रसाद म्हणतात.