फुटाणे म्हणजे सुपरपॉवर आहे

    05-Sep-2026
Total Views |

futane 
खाण्याची सहज साेपी मेजवानी. फुटाण्यामध्ये प्रथिने, लाेह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. दरराेज थाेडेसे फुटाणे खाल्ल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा सहज मिळते. मांसाहार न करणाऱ्यांसाठी तर हे उत्तम प्रथिनांचा स्राेत आहे.
 
फुटाण्यातील फायबरमुळे पाेट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे उत्तम लाे-कॅलरी स्नॅक आहे संशाेधनानुसार, फुटाण्यातील खनिजे व प्रतिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धाेका कमी करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने रक्तदाब संतुलित राहताे. लहान मुलांना वाढीसाठी व अभ्यासासाठी लागणारी ऊर्जा फुटाण्यातून सहज मिळते. वृद्धांना पचायला साेपे, हलके व पाैष्टिक असे अन्न म्हणजे फुटाणे.
 
आजच्या फास्ट-फूडच्या युगात आराेग्यासाठी हानिकारक स्नॅक्सपेक्षा फुटाण्यासारखा स्वस्त, पाैष्टिक व सहज उपलब्ध पर्याय स्वीकारला पाहिजे. आपल्या आजी-आजाेबांनी जपलेली ही आराेग्यपरंपरा आपणही पुढच्या पिढ्यांना द्यायला हवी.म्हणूनच लक्षात ठेवा फुटाणे खा, तंदुरुस्त राहा!