आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर; लोकल फेऱ्या वाढवणार

रेल्वे मंत्र्यांची घोषणा : मुंबई- सावंतवाडी एक्स्प्रेसचा उत्साहात शुभारंभ

    05-Sep-2026
Total Views |

railway 
मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी सुमारे 18 हजार काेटींची विविध कामे सुरू आहेत. सध्या राेज धावणाऱ्या सुमारे 3200 लाेकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून 2030 पर्यंत 3500 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 18 वर आयाेजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याेग मंत्री पीयूष गाेयल ऑनलाइन उपस्थित हाेते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापाैर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित हाेते.
 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पांतर्गत विविध कामे पूर्ण झाली आहेत. वांद्रेकुर्ला संकुल ते ठाणे दरम्यानच्या भूमिगत मार्गात देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बाेगद्याचे काम सुरू आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काॅरिडाॅर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचेही रेल्वे मंत्र्यांनी नमूद केले.
 
काेकणाला निसर्गसाैंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. जलद आणि सुलभ दळणवळण सुविधांमुळे काेकणातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी अधिक सहज उपलब्ध हाेतील. या रेल्वे सेवेमुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय, हाॅटेल उद्याेग, वाहतूक सेवा आणि राेजगार संधींना प्राेत्साहन मिळेल. आता काेकणचा विकास थांबणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्य्नत केला.
 
या रेल्वे सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. उत्तम दळणवळण सुविधांमुळे काेकणात उद्याेग, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिक युवक- युवतींना परिसरातच राेजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध हाेतील, असे गाेयल यांनी नमूद केले.