एसटीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक

    05-Sep-2026
Total Views |

ST 
मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देतानाच खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चाैकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयाेग राबवावेत. विशेषतः विनावाहक बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्चात बचत करण्याबराेबरच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्दे श परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. एसटीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययाेजनांचा आढावा घेताना सरनाईक यांनी ही भूमिका मांडली. एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्राेत निर्माण करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे, या तिन्ही बाबींवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्य्नत केली. एसटीचा आर्थिक ताेटा कमी करण्यासाेबतच प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ हाेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवासाची पद्धत आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख याेजना राबवाव्यात. एसटीचे आर्थिक बळकटीकरण करतानाच प्रवाशांच्या हिताशी काेणतीही तडजाेड न करता आधुनिक, कार्यक्षम सेवा देण्यावर भर राहील, असे सरनाईक यांनी सांगितल