मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
इस्राइलमध्ये राेजगारासाठी राज्यातील 103 बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी रवाना झाली आहे. आगामी कालावधीत टप्प्याटप्याने कामगार रवाना हाेतील. इस्राइलमध्ये राेजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठाेर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह राज्याचा आणि देशाचा नावलाैकिक वाढवावा. भारतीय संस्कृतीचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता जपावी. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासात हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्राची काैशल्यश्नती आता जगभर या कार्यक्रमांतर्गत इस्राइलमध्ये राेजगारासाठी निवड झालेल्या राज्यातील कुशल बांधकाम कामगारांशी लाेढा यांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, काैशल्य विकास विभागाचे आयु्नत अमित सैनी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, केंद्रीय काैशल्य विकास विभागाचे अवर सचिव चंद्रहंस राठाेड, राष्ट्रीय काैशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सिन्हा आदी अधिकारी उपस्थित हाेते.