मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
जैवतंत्रज्ञान, संशाेधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची संधी आहे या भागीदारीला नवी गती देण्यात येईल, असे सांगत राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी या संधींचे प्रत्यक्ष प्रकल्प, राेजगारनिर्मिती आणि सामायिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायाेमॅन्युफॅक्चरिंग टास्क फाेर्स स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन कंपन्यांच्या शिष्टमंडळासाेबत सह्याद्री अतिथिगृहात रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करून राज्यातील जैवउत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतर आणि संशाेधन सहकार्याच्या संधींबाबत संवाद साधला.नी सांगितल.