सर्वसमावेशक विकास हाच विकसित महाराष्ट्राचा आधारस्तंभ : मुख्यमंत्री

शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षकांचा सत्कार सोहळा

    05-Sep-2026
Total Views |

disha 
मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
सर्वसमावेशक विकास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे. विकसित महाराष्ट्र-2047 या ध्येयाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हाेणे आवश्यक असून, ‘दिशा’ अभियानातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. या अभियानाशी जाेडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना त्यांच्या अमूल्य याेगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गाैरवण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विशेष मुलांना याेग्य शिक्षण, संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी असून, या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयाेजित कार्यक्रमात विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. जय वकील फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, एसीईसीएफचे सहसंस्थापक अमित चंद्र, जय वकील फाउंडेशनच्या अध्यक्ष व संचालक डाॅ. अनायता हेगडे, बजाज फिनसर्व्हच्या अध्यक्ष शेफाली बजाज, एचटी पारेख फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माणिक गुरसळ, आयु्नत सत्यजित बडे, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राष्ट्रीय बाैद्धिक दिव्यांगजन सश्नतीकरण संस्थानचे संचालक राम कुमार यांच्यासह राज्यभरातील विशेष शिक्षक ऑनलाइन उपस्थित हाेते. बाैद्धिक अक्षम मुलांसाठी देशातील पहिला प्रमाणित अभ्यासक्रम असलेल्या दिशा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल यामिनी काळे (संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (लातूर), वैशाली गायकवाड (नागपूर), ज्ञानेश्वर काळे (देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम (मुंबई शहर) या पाच विशेष शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.